आधार कार्ड घरपोच मिळवा -Get Aadhar Card Home Delivery


आधार कार्ड घरपोच मिळवा. मोबाईल आधारला जोडला नसला तरीही......!

(Get Aadhar Card Home Delivery - Though Aadhar - Mobile Not Linked)


भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. यात नाव, पत्ता आणि इतर माहितीसह बॉयोमेट्रिक माहिती देखील असते. पण जर आपले Aadhaar Card हरवले असेल आणि आपला मोबाईल नंबर देखील त्याला लिंक केलेला नसेल किंवा नंबर बदलला असेल तर uidai च्या वेबसाइटवर 'ऑर्डर आधार रीप्रिंट' सेवेचा लाभ उचलू शकता. आधार रीप्रिंट करण्यासाठी आपल्याला 50 रुपये जमा करावे लागतील.

यूआयडीएआयनुसार OTP ऑथेंटिकेशनद्वारे हरवलेले आधार कार्ड मिळू शकते. यासाटी आधार वेबसाइट अथवा mAadhaar App चा वापर करावा लागेल. आधार रिप्रंट करण्यासाठी ५० रुपये शुल्क लागेल. याद्वारे नवीन आधार कार्ड थेट तुमच्या पत्त्यावर येईल. 

आधार कार्ड घरपोच मिळविण्यासाठी तुम्हाला  मिळवा. UIDAI च्या अधिकृत वेबसाइट www.uidai.gov.in वर जावे लागेल.

अधिकृत वेबसाइटवर आपल्याला  माझा आधार  (My Aadhar) सेक्शनमध्ये दिसत असलेल्या ऑर्डर आधार पी व्ही सी कार्ड  (Order Aadhaar PVC card) पर्याय दिसेल ज्यावर क्लिक करायचे आहे.


यानंतर खालील प्रमाणे करावे 

  • आधार नंबर टाकावा.
  • सिक्योरिटी कोड टाकावा.
  • "My mobile number is not registered" ह्या ऑपशनला क्लिक करावे.
  • आपल्या जवळील मोबाइल नंबर टाकून  "Send OTP" बटन  क्लिक करावे. 
  • मोबाइल वर प्राप्त झालेला "OTP" टाकावा. 
  • "Terms and conditions" ऑपशनला क्लिक करावे. 
  • एक नोटिफिकेशन येईल. त्याला "ओके" करावे. 
  • "I hereby confirm that I have read and understood the Payments / Cancellation / Refunds Process." ऑपशनला क्लिक करावे.
  • आपल्याला मेक पेमेंट (Make Payment) वर क्लिक करायचे आहे


मेकपेमेंट साठी 50 रुपए शुल्क लागेल. आपण डेबिट किंवा क्रेडिट कार्ड,  इंटरनेट बँकिंग किंवा यूपीआई (UPI) यातून कोणत्याही माध्यमाने पेमेंट करू शकता.पेमेंट 

पेमेंट  केल्यावर आधार कार्ड पुढील 15 दिवसात आपल्या पत्त्यावर पोहचून जाईल.


mAadhaar App

mAadhaar एक असे मोबाइल अँप्लिकेशन आहे ज्यामध्ये तुम्ही तुमचे आधार प्रोफाइल सेव्ह करु शकता. या अँप्लिकेशनमध्ये एकूण पाच आधार प्रोफाइल लिंक केले जाऊ शकतात. mAadhaar App मध्ये सेव्ह केलेले आधार कार्ड देशातील कोणत्याही भागात गरज पडल्यास दाखवू शकता.  mAadhaar App संपूर्ण देशात मान्य आहे.

mAadhaar ची सर्वात खास गोष्ट ही आहे की, या अॅपचा जितक्या वेळ वापर कराल तितक्या वेळा पासवर्ड टाकावा लागेल. यामुळे या mAadhaar App मधील नोंद आपली सर्व माहिती सुरक्षित राहू शकते. या फीचरच्या मदतीने तुमचा सर्व डेटा पूर्णपणे सुरक्षित राहील व तुमच्याशिवाय दुसरा व्यक्ती तुमच्या परवानगीशिवाय या अँप्लिकेशनचा एक्सेस करू शकणार नाही.  mAadhaar App सर्व अँड्रॉएड फोनबरोबरच आयफोनमध्येही डाउनलोड केले जाऊ शकते.

याप्रकारची माहिती मिळविण्यासाटी ग्रुप जॉईन करा Join Now
..... |

No comments

Powered by Blogger.