गोपीनाथजी मुंढे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
सुरक्षा
सानुग्रह अनुदान योजना
महाराष्ट्र शासन कृ वि, पशुसंवर्धन विकास व मत्स्यव्यवसाय विभाग शासन क्र. : शेअवि-2020/प्र.क्र. 330/11-अे
१९ एप्रिल २०२३
शेतकरी
अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान (गोपीनाथजी
मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान) योजना राबवण्यास मान्यता
देण्याबाबतचा शासन निर्णय १९ एप्रिल २०२३ रोजी
झाला, अधिक माहिती पुढीलप्रमाणे ....
गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत
राज्यातील शेतकऱ्यांचा शेती करत असताना होणारे
अपघात यापासून संरक्षण मिळावे याकरिता हि योजना सुरु करण्यात आली आहे.
अपघाताचे प्रकार
- पाण्यात बुडून मृत्यु होणे
- कीटकनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे होणारी विषबाधा
- विजेचा धक्का बसने अथवा वीज पडणे
- उंचावरून पडून झालेला अपघात
- सर्पदंश
- नक्षलवाद्यांकडून होणारी हत्या
- जनावरांनी खाल्ल्यामुळे अथवा त्याच्या चावण्यामुळे जखमी किंवा होणारे मृत्यू
- दंगल
अन्य कोणतेही अपघात यामुळे मृत्यू
झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची
परिस्थिती निर्माण होते, अशा अपघातग्रस्त शेतकर्यास / त्यांच्या कुटुंबास आर्थिक
लाभ देण्याकरिता शासनाकडून रु. २ लाख पर्यंत लाभ देण्यात येतो. सदर सुधारित
योजनेंतर्गत अपघातग्रस्त शेतकऱ्यांस व त्यांच्या कुटुंबासआर्थिक लाभ देण्याकरिता
राज्यातील सर्व्व्व वाहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्यांच्या कुटुंबातील
वाहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले कोणताही १ सदस्य (आहे-वडील, शेतकर्याची पती/पत्नी,
मुलगा, अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे एकूण २ जणांना गोपीनाथ
मुंढे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यास संदर्भ क्र.(१) येथील शासन निर्णयान्वये
मान्यता देण्यात आली आहे. सदर योजना दि. ९ डिसेंबर पासून राबविण्यात येत आहे.
येथे जी.आर. वाचा :- वाचा
Post a Comment