Student Scholership 2023



खुशखबर.. आता पाचवीसाठी ५००० रुपये प्रतिवर्ष आणि आठवीसाठी ७५०० रु. प्रतिवर्ष अशी शिष्यवृत्ती.

 

शासनाकडून राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सतत नवनवीन योजना राबविण्यात येतात. त्याचप्रमाणे जुन्या योजनांमध्ये महत्त्वपूर्ण आमूलाग्र बदल करण्यात येतात. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ निर्णयात असाच एक महत्त्वपूर्ण बदल शासनाकडून करण्यात आलेला आहे. याबद्दलची थोडक्यात माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

मंगळवार दिनांक 13 जून 2023 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासनाकडून विविध निर्णय घेण्यात आली, ज्यामध्ये कृषी विभागातील काही निर्णय, कर्मचारी विभागातील काही निर्णय व शैक्षणिक विभागातील काही निर्णय होते. यामध्ये विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भातील एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील बहुतांश विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळणार आहे. 

पाचवी तसेच आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करुन त्यांना अधिक प्रोत्साहन देण्याचा निर्णय. उच्च प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा योजनेत आता पाचवीसाठी ५००० रुपये प्रतिवर्ष आणि आठवीसाठी ७५०० रु. प्रतिवर्ष अशी शिष्यवृत्ती.

यामुळे पाचवीच्या विद्यार्थ्यांस दर महिन्याला ५०० रुपये आणि आठवीच्या विद्यार्थ्यांस दरमहिन्याला ७५० अशी शिष्यवृत्ती मिळेल. ही शिष्यवृत्ती १० महिन्यांसाठी असते. सध्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीकरिता किमान २५० रुपये ते कमाल १००० रुपये प्रति वर्ष तर माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी किमान ३०० ते कमाल १५०० प्रति वर्ष एवढी संचनिहाय शिष्यवृत्ती देण्यात येते.

पूर्वीची शिष्यवृत्ती : सध्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती 250 ते 1000 रुपये पर्यंतच आहे. त्याचप्रमाणे माध्यमिक शिष्यवृत्ती 300 ते पंधराशे रुपये पर्यंतच आहे. विशेष म्हणजे या शिष्यवृत्ती योजनेत मागील तेरा वर्षापासून कोणताही बदल किंवा वाढ करण्यात आलेली नव्हती. वाढत्या महागाईचा व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विचार करता काही जाणकार लोकांमार्फत शिष्यवृत्तीच्या रकमेमध्ये वाढ करण्यात यावी असे उपस्थिती दर्शविण्यात आली होती. दरम्यान राज्यशासनाने जाणकार लोकांची बाजू घेत विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

शिष्यवृत्ती वाढ किती ? : कालच्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत पाचवी तसेच आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला असून आता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5,000 रु. तर आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 7,500 एवढी शिष्यवृत्ती देण्यात येईल. म्हणजेच आता पाचवीच्या विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये मिळणार असून ही शिष्यवृत्ती दहा महिन्यासाठी देय असेल, त्याचप्रमाणे आठवीच्या विद्यार्थ्यांना दरमहा 750 रुपये शिष्यवृत्ती दिली जाईल. ही शिष्यवृत्ती 2023-24 या शैक्षणिक वर्षापासून लागू केली जाणार आहे.

 



याप्रकारची माहिती मिळविण्यासाटी ग्रुप जॉईन करा Join Now
..... |

No comments

Powered by Blogger.